कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखे -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

विजय शिंदे 

माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या 18व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखे आहे.भाऊंचा 82 वर्षाचा आयुष्यातील प्रवास यशस्वी होता.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व युवा नेते राजवर्धन पाटील आणि मान्यवरांनी इंदापूर महाविद्यालयातील कर्मयोगी भाऊंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. भजन मंडळाने यावेळी भजनाचे सादरीकरण केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग , विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय छात्रसेना आयोजित श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील ( भाऊ ) यांच्या 18व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ‘ एक पेड माँ के नाम ‘ या उपक्रमांतर्गत राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते 500 रोपांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ भाऊंनी आपल्या कर्तुत्वाने आणि सर्वांच्या सहकार्याने इंदापूर तालुक्याचे नाव दिल्लीच्या संसदेपर्यंत नेले. भाऊ हे उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे ,दूरदृष्टीचे नेते होते. भाऊंनी पुढील 50 वर्षाचा दृष्टिकोन समोर ठेवून उजनी धरण तसेच कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना , शैक्षणिक संस्था , कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापना करून इंदापूर तालुक्याचा विकास केला. आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचे कार्य भाऊंनी केले.

भाऊ असतानाचा काळ आणि नंतरचा काळ आपण सर्वांनी पाहिला. भाऊ नंतर ही सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर आली .गेल्या 18 वर्षांनंतर देखील खंबीरपणे भाऊंच्या मार्गदर्शनानुसार आपण ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत पुढे जात आहोत. अनेक अडचणी आल्या , राजकारणात अडथळे निर्माण केले गेले परंतु यातून मार्ग काढत आपण पुढे गेलो .नवीन पिढीने भाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे.
यावेळी ॲड.राकेश शुक्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. उत्तम माने यांनी ‘ एक पेड माँ के नाम ‘ या उपक्रमाचा उद्देश सांगितला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भरत भुजबळ आणि श्याम सातार्ले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here