इंदापुरात कोणाचा पाचर्णे होणार.? पवार साहेब हे संशोधनाचा विषय तालुक्यात चर्चा.!!

विजय शिंदे 

साल होते २००९ देशात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून द्या केंद्रात कृषी मंत्री असलेले शरद पवार पंतप्रधान होतील हीच संधी आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराला सुरुवात केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पहिल्यांदाच बारामती मतदारसंघ सोडून माढा लोकसभा मतदार संघात उभे राहिले होते. तर बारामतीतून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या प्रथमच लोकसभेच्या मैदानात उतरल्या होत्या.

शरद पवार पंतप्रधान होणार असतील तर एक मराठी माणूस म्हणून माझा पाठिंबा असेल असे म्हणत शिरोळ लोकसभा मतदारसंघातील एक भारतीय जनता पार्टीचा आमदार पुढे आला, पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली त्या विद्यमान आमदाराने लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदतही केली मात्र त्यांचा पराभव झाला शिवसेनेचे आढळराव पाटील विजयी झाले.

नंतर एक सहा महिन्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली, भाजपने कारवाई केलेल्या विद्यमान आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ही केला, सगळ्यांना कळून चुकलं की आता शिरूर मतदार संघाची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी ही विद्यमान आमदारांनाच मिळणार परंतु कळले ते शरद पवार कसले, त्यांचे राजकीय विरोधक हे म्हणतात शरद पवार बोलतात एक आणि करताहेत एक, त्यांच्या मनात काय सुरु आहे.हे जाणून घेण्यासाठी संशोधनाची गरज आहे .”शरद पवारांनी ऐनवेळी त्या आमदाराला डच्चू देत आपल्या भात्यातील अशोक पवार नावाचा एक बाण काढला साहेब माझं काय चुकलं म्हणत राहिले.

त्या आमदाराचे नाव होते बाबुराव काशिनाथ पाचर्णे
हातचे गेले ऐनवेळी राष्ट्रवादीने ही नाकारले अखेर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणी अवघ्या सहा हजार मताने पराभव झाला, विशेष म्हणजे ही निवडणूक पंचरंगी झाली, राष्ट्रवादीचे अशोक पवार आमदार झाले,भाजपकडून मंगलदास बांदल तर अपक्ष निवृत्ती गवारी, के डी कांचन यांनी ही निवडणूक लढवली होती.

पुढे बाबुराव पाचर्णे यांनी झालेली चूक दुरुस्त करत भाजपमध्ये प्रवेश करत २०१४ साली विधानसभा लढवली यामध्ये त्यांनी अशोक पवार यांचा पराभव करत विजय मिळवला. गेली दोन वर्षांपूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले.

इंदापुरात ही विधानसभेचे वारे वाहू लागले आहे महायुती कडून आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत तर महाविकास आघाडी कडून आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने इच्छुक आहेत. महायुती चे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच शरद पवार आपले पत्ते उघडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली इंदापुरात सर्वच नेत्यांना एका छताखाली आणण्याचे काम राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष करत असून, इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात सर्वच नेते एकत्र आल्यानंतर कोणाचा “पाचर्णे” होणार याची चर्चा मात्र सध्या इंदापूर तालुक्यात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here