विजय शिंदे
नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूरच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती नंदा गुलाब बनसुडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
“नवी दिशा नवे उपक्रम”या राज्यस्तरीय समूहातर्फे आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा २०२४ ९ मार्च २०२४ रोजी राजीव गांधी ई- लर्निंग स्कूल सहकारनगर, पुणे येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये शंभर उपक्रमशील शिक्षकांना गौरविण्यात आले.
या वेळी श्रीमती बनसोडे यांनी सादर केलेल्या विविध नवोपक्रमांच्या शतक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे” या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास मा. श्रीम. शुभांगी चव्हाण- उपशासकीय अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे मनपा या अध्यक्षस्थानी होत्या. SCERTचे अध्यक्ष राहुल रेखावार साहेब, सहसंचालक मा. डॉ .शोभा खंदारे मॅडम आणि श्री. माणिक देवकर साहेब- क्रीडा विभाग प्रमुख शिक्षण विभाग पुणे मनपा हे उपस्थित होते. श्री. देवराव चव्हाण सर, श्री बळीराम जाधव सर आणि श्री आयुब शेख सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.