विजय शिंदे
समाज मंदिरांचे ग्रंथालय अभ्यासिकेत रूपांतर करणे या योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना
साहित्य वाटपाचा कार्यक्रम (दि शुक्रवार१३) इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर पंचायत समितीच्या स्वर्गीय शंकरराव पाटील सभागृहात संपन्न झाला.
यावेळी इंदापूर तालुक्यातील पात्र ठरलेल्या गावांना समाज कल्याण विभागाच्या वतीने संगणक कपाट खुर्ची, स्पर्धा परीक्षेची पुस्तके देण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की इंदापूर तालुक्यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी कोट्यावधी रुपये खर्चून अभ्यासिका निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून येत्या काळात हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना गट विकास अधिकारी सचिन खुडे यांनी केली.या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे, कार्याध्यक्ष अतुल झगडे,सहाय्यक गटविकास अधिकारी संजय जगताप, बांधकाम विभागाचे उपअभियंता राऊत साहेब, अल्पसंख्यांक विभागाचे गपुर सय्यद,विस्तार अधिकारी बी.बी खोमणे, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी अजित घोगरे, हनुमंत खांडेकर अधीक्षक, लक्ष्मण राऊत साहेब, अनिलकुमार तोंडे , प्रमोद शेलार, समाज कल्याण विभागाचे वैभव नाळे, शशिकांत करडे , किरण गायकवाड, संतोष रोडे, सूर्यकांत कचरे, रामदास वागजकर, नागनाथ कदम, विस्ताराधिकारी शेख यांनी सूत्रसंचालन केले