विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील जनतेला सुख,समृद्धी, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य तसेच बळीराजा सुखी होण्यासाठी उजनी धरणातील पाणी वर्षभर टिकून राहावे अशा प्रकारचे साकडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी गणेशाकडे घातले. भिगवण परिसरातील शिवछत्रपती ग्रुप डिकसळ, जय शिवराय तरुण मंडळ तक्रारवाडी , भिगवण येथील युवा प्रतिष्ठान व दुनियादारी ग्रुप तसेच मदनवाडी येथील स्वामी विवेकानंद असोसिएशनचा राजा मानाचा गणपती या मंडळांना प्रविण माने यांनी बुधवार ( ता.११) रोजी भेट देऊन श्रींची आरती केली व पदाधिकाऱ्यांची संवाद साधला.
शेतकऱ्यांना आगामी काळात कुठलीही अडचण येऊ नये तसेच पीक पाणी जोमात येऊन त्यांना योग्य बाजारभाव मिळावा बळीराजा सुखी होऊन बाजारपेठ फुलु दे अशी प्रार्थना माने यांनी गणरायाकडे केली. त्यानंतर कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले श्री गणरायाचे तसेच लोकनेते शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने व तुम्हा सर्वांच्या सहकार्याने या तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाल्यास त्या संधीचे मी सोने करणार असुन तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जीवाचे रान करणार आहे तरी मला आपण सर्वांनी ती संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रवीण माने यांना इंदापूर तालुक्यातील गणेश मंडळाकडून आमंत्रित केले जात असल्याचे दिसून येते.