विजय शिंदे
आगामी विधानसभा निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. राजकीय पक्षांकडूनही मेळावे, इच्छुकांची चाचपणी, मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी आवश्यक प्रयत्न सुरू असताना निवडणूक आयोगाकडूनही तयारी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत महायुती कडून राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे आमदार दत्तात्रय भरणे यांना महायुती कडून उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत दरम्यान महायुतीकडून इच्छुक असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, महाविकास आघाडी कडून पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने व जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे इच्छुक आहेत.त्यामुळे आगामी काळात इंदापुरात पुन्हा एकदा तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवार दिनांक १६ रोजी इंदापूर येथील दूधगंगा दूध उत्पादक संघात तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.पाटील हे अपक्ष निवडणूक लढवणार की राष्ट्रवादी (SP) पक्षात जाणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.