विजय शिंदे
बावडा (ता. इंदापूर) येथील अनुसया सामाजिक प्रतिष्ठान व ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर जाधव यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बारामती येथील टॅलेंट कट्टा या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.
सन्मानपत्र सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ आणि शाल भेटा देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी टॅलेंट कट्टा चे संस्थापक अध्यक्ष दिपक जाधव, डॉ.स्नेहल जोशी, अभिनेत्री आर्या घारे,श्री. राम बंडगर , सौ. रश्मी सोनोने तसेच अनुसया सामाजिक प्रतिष्ठान चे सचिन जाधव, पुजा जाधव, मीनाबाई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते…