विजय शिंदे
स्वामी विवेकानंद असोसिएशनने भिगवण परिसरातील उपेक्षित घटकांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित केले ही बाब कौतुकास्पद असून यामुळे या कर्मचाऱ्यांची काम करण्याची ऊर्जा आणखी जोमाने वाढेल असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
मदनवाडी चौफुला (ता.इंदापूर) येथील स्वामी विवेकानंद असोसिएशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त पोलीस व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी भरणे बोलत होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष दादासाहेब थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, अमोल भिसे,तुकाराम बंडगर, नानासाहेब बंडगर,धनाजी थोरात, सतिश शिंगाडे आदी उपस्थित होते. पाच दिवस चाललेल्या या उत्सवामध्ये परिसरातील विविध क्षेत्रात सेवा करणाऱ्या नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंडळाचे उपक्रम पाहून कार्यकर्त्यांचा सन्मान केला. रा. काँ. चे जिल्हाधध्यक्ष प्रदीप गारटकर, सारिका भरणे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व परिचारिका यांचा सन्मान करण्यात आला तर जि. प.चे माजी सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते डॉक्टर बांधवांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे जि.प. चे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या हस्ते ग्रामपंचातींच्या कचरा वेचक महिला व महावितरण कर्मचारी, शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक नितीन चितळकर यांनी केले तर नानासाहेब मारकड ,महादेव बंडगर यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन डॉ काशिनाथ सोलनकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप वाघमोडे,प्रवीण थोरात, गणेश थोरात,करण बंडगर, ओंकार मारकड, राजवर्धन थोरात, सौरभ शेगर, यशराज बंडगर, उमेश गायकवाड, रोहन बंडगर, आदित्य गायकवाड,महारुद्र थोरात यांनी परिश्रम घेतले.
समाजातील सेवा बजावणाऱ्या विविध स्तरातील नागरिकांचा सन्मान केल्याने यावेळी डॉक्टर,पत्रकार, पोलिस,शिक्षक, महावितरण कर्मचारी यांनी स्वामी विवेकानंद असोसिएशनच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले व कृतज्ञता व्यक्त केली.
सभा मंडपासाठी 15 लाखांचा निधी:
स्वामी विवेकानंद असोसिएशनचे संस्थापक दादासाहेब थोरात यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेऊन मंडळाला योग्य ती मदत करण्याची आमदार भरणे यांच्याकडे मागणी केली त्यानंतर भरणे यांनी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंद असोसिएशनच्या सभा मंडपासाठी 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली व त्याचप्रमाणे भिगवण पत्रकार संघाच्या इमारतीच्या फर्निचर साठी पाच लाख रुपयाचा निधी देण्याचे घोषणा केली.त्यामुळे असोसिएशनच्या वतीने आमदार भरणे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन स्वामी विवेकानंदाची प्रतिमा देवून सन्मान करण्यात आला.
वृत्तपत्र क्षेत्रामध्ये 40 वर्षांपासून वृत्तपत्र घरोघरी पोहोचवणाऱ्या विनायकर शेलार यांचा विशेष सन्मान करण्यात आला तर प्रतिकूल परिस्थितीशी मात करुन पाच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या मदनवाडीच्या पायल पोपट देवकाते हिचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे खेड(ता . कर्जत)येथील शेटे कुटुंबातील; सागर व प्रतिषा शेटे या दोन्ही बहीण-भावंडांची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल देखील फेटा बांधून व रोपटे व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे शासकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळाल्याबद्दल मालनी थोरात व अर्जुन सिंह मारकड यांचा देखील सन्मान करण्यात आला.
पाच दिवसीय कार्यक्रमात सत्कारमूर्ती भारावले::
अनेक वेळा आम्ही चांगली कामे करत असतो मात्र याची म्हणावी अशी दखल घेतली जात नाही परंतु मदनवाडी चौफुला येथील स्वामी विवेकानंद असोसिएशनने आमच्या कामाची दखल घेऊन आमचा यथोचित सन्मान केला याबद्दल डॉक्टर, पत्रकार, महिला कर्मचारी, ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी शिक्षक वर्ग आदींनी या उपक्रमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली तुमच्या या सत्कारामुळे आम्हाला ऊर्जा मिळाली असून पुढील काळात देखील आम्ही चांगल्या जोमाने काम करू अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.