विजय शिंदे
इंदापूर तालुका विकास आघाडीच्या जाचकवस्ती, लासुर्णे, परीटवाडी या 3 शाखांची उद्घाटने गुरुवारी (दि.12) करण्यात आली. या 3 शाखांमुळे विकास आघाडीच्या इंदापूर तालुक्यातील शाखांची संख्या 85 एवढी झाली आहे.तसेच इंदापूर तालुक्यात आगामी सहा-सात दिवसात विकास आघाडीच्या आणखी 15 शाखांची स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे इंदापूर तालुका विकास आघाडीच्या एकूण शाखांची संख्या 100 होणार आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरातच इंदापूर तालुका विकास आघाडीच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
इंदापूर विधानसभा मतदार संघातून हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढवावी, याकरिता इंदापूर तालुका विकास आघाडी आग्रही असून, हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आणणेसाठी आंम्ही जीवाचे रान करू, असा निर्धार या शाखांच्या उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. इंदापूर तालुका विकास आघाडीच्या शाखांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
______________________________