उपसभापती रोहित मोहोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन.

विजय शिंदे 

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तसेच इंदापूर तालुक्यातील आनंदनगर (जंक्शन) ग्रामपंचायतचे सरपंच रोहित वसंतराव मोहोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

इंदापूर तालुक्यातील जंक्शन आनंदनगर येथील मोहोळकर कुटुंब नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतं परिसरातील शैक्षणिक, औद्योगिक व सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात रोहित मोहोळकर काम करत आहेत.

२१ सप्टेंबर रोजी रोहित मोहोळकर यांचा वाढदिवसा निमित्ताने बँक ऑफ बडोदा शेजारी आनंदनगर (जंक्शन) येथे रात्री साडेआठ वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here