विजय शिंदे
श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथे नीरा नदी पात्रात श्री गणेश विसर्जनासाठी गेलेला मुलगा बुडाल्याची घटना मंगळवारी (दि.17) दुपारी घडली. अनिकेत विनायक कुलकर्णी ( वय – 16 वर्षे, रा. परांडा तालुका) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. सदरची घटना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दुपारी समजतात तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून, दुर्दैवी मुलाच्या युद्धपातळीवर शोधकार्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. इंदापूरचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक, घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नीरा नरसिंहपूर येथे वेद अध्यायन शिकविणाऱ्या पाठशाळेत अनिकेत कुलकर्णी हा शिकत होता. गणेश विसर्जनासाठी नदीपात्रात तो इतर मुलांसह गेला असता सदरची दुर्दैवी घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल होत असून, होडीतून व पाण्यात बुड्या घेऊन सदर मुलाच्या सध्या शोध घेतला जात आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या दुर्दैवी घटने संदर्भात बारामतीचे उपविभागीय अधिकारी यांच्याशी व स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मदत कार्याच्या सूचना दिल्या आहेत. या दुर्दैव घटनेबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे.
___________________________