विजय शिंदे
शहाजीनगर येथे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व युवा नेते राजवर्धन पाटील यांचे हस्ते शासकीय सेवेत निवड झालेल्या तसेच सध्या विविध पदांवरती कार्यरत असलेल्या युवकांचा सत्कार गुरुवारी (दि. 19) करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजवर्धनदादा तरुण गणेशोत्सव मंडळ शहाजीनगर (खंडोबाचीवाडी) व राजवर्धनदादा युवा मंच शहाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी बोलताना राजवर्धन पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील युवकांची शासकीय सेवेत मोठ्या संख्येने निवड होत आहे, ही आनंदाची बाब आहे. अशा सन्मानामुळे सध्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या युवकांना निश्चितपणे प्रेरणा मिळणार आहे. यावेळी भाषणात राजवर्धन पाटील यांनी सत्कारमूर्ती युवकांना व त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. तसेच या चांगल्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल राजवर्धन पाटील यांनी राजवर्धनदादा तरुण गणेशोत्सव मंडळ व राजवर्धनदादा युवा मंचाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.
___________________________