विजय शिंदे
धनगर समाज बांधवाना एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अमलबजावणी करणे बाबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज हा पिढ्यानपिढ्या पासून मेंढपाळाचा व्यवसाय करीत आलेला आहे. अत्यंत शांत, संयमी व काबाडकष्ट करणारा बहुतांश धनगर समाज हा महाराष्ट्रातील आर्थिक जडण घडणातील एक महत्वाचा घटक आहे. परंतु सध्या या समाज बांधवांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या जमातीचा अनुसूचित जातीमध्ये समावेश होणेबाबत अनेक वर्षापासून तीव्रतेने मागणी होत आहे. व या अनुषंगाने विविध पद्धतीने शांततेच्या मार्गाने आंदोलने पुकारण्यात येत आहेत.
सध्या पंढरपूर येथे सकल धनगर समाजाचे मागील १३ दिवसापून आमरण उपोषण सुरु आहे. या समाजचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक मागासलेपण लक्ष्यात घेता हि मागणी योग्य आहे. तरी महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने हिताचा निर्णय तातडीने घ्यावा, ही नम्र विनंती.
यावेळी धनगर समाज बांधव यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली असून धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेणार असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर येथे सुरू असलेल्या आंदोलन ठिकाणी भेट देणार असल्याचे पाटील म्हणाले.