चिमुरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला एन्काउंटर.

विजय शिंदे 

बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. 2 चिमुरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आली आहे. जीपमधून नेत असताना अक्षयने रिव्हॉल्व्हर हिसकावली आणि पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला.

 

या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या गोळीबारामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे.

 

मिळाळेल्या माहितीनुसार, बदलापूर शाळेतली दोन चिमुरडीवर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. आज तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. अक्षयला जीपमधून नेत असताना मुंब्रा बायपास इथं पोहोचल्यावर अचानक अक्षयने एपीआय निलेश मोरे यांची रिव्हॉल्व्हर हिसकावली. यावेळी त्याने पोलिसांवरच 3 राऊंड फायर केले. पोलिसांनी लगेच प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. अक्षयच्या डोक्याला एक गोळी लागली तर दुसरी शरिरावर लागली. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या गोळीबार एक पोलीस अधिकारीही जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पण, अक्षयचा मृत्यू झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

 

नेमकं काय घडलं?

 

– तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना घडली घटना

– मुंब्रा बायपास जवळून जात असताना,आरोपी अक्षय शिंदे यानं खेचली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर

– API निलेश मोरे यांची खेचली रिव्हॉल्व्हर

– निलेश मोरे यांच्यावर केल्या 3 गोळ्या फायर

– यातील एक गोळी निलेश मोरच्या पायाला लागली

– तर 2 गोळ्यांचा फायर चुकला

– जखमी निलेश मोरे यांनी त्याही परिस्थितीत अक्षय शिंदेवर हल्ला केला

– सोबत असलेले दुसरे अधिकारी,पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी, स्वरांक्षणासाठी गोळीबार केला

– स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या

– यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरिरावर लागली

– दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं

– दरम्यान, अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय अशी खात्रीलायक माहिती

– पोलिसांनी मात्र अद्याप दुजोरा दिला नाही

 

अक्षय शिंदेची संपूर्ण कुंडली

 

आरोपी अक्षय शिंदे याचं वय 24 वर्षांचं असून त्याला सफाईसाठी नेमलेल्या कंपनीने कामावर ठेवलं होतं. आरोपी अक्षय शिंदे 1 ऑगस्टला शाळेत कामावर लागला होता. अक्षय शिंदे हा सफाई कर्मचारी होता. अक्षयने 12 तारखेला एका मुलीचा विनयभंग केला त्यानंतर त्याने 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले.

 

प्रकरण कसं आलं लक्षात

आदर्श शाळा नावाच्या शाळेत शिकणाऱ्या ३ वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार घडला. पीडित मुलींच्या पालकांना जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी शाळेत तक्रार केली. तसंच पोलिसात धाव घेतली. पण शाळेकडून यावर कठोर पावले उचलली गेली नाहीत. पोलिसांनीही तक्रार दाखल करून घेण्यात दिरंगाई केल्याचा आरोप पालकांनी केला. पीडित मुलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचं घरच्यांना सांगितलं, त्यानंतर पालक तिला डॉक्टरकडे घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर इजा झाल्याचं सांगितलं. यानंतर पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं मात्र रात्री 12 वाजेपर्यंत पोलिसांनी पालकांना बसवून ठेवलं. मनसेने याबाबत आवाज उठवायला सुरूवात केल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here