हर्षवर्धन पाटील बुधवारी (दि.१३) पळसदेव मध्ये;आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन.

विजय शिंदे

भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पळसदेव येथे बिजवडी पळसदेव गटाचा बुधवार (दि.13) सायंकाळी 6 वाजता भाजपचा विजय संकल्प मेळावा 2024 आयोजित करण्यात आला आहे.

संकल्प 2024 संकल्प विजयाचा या अभियानांतर्गत पळसदेव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सायंकाळी 6 वाजता मेळावा संपन्न होणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सर्व क्षेत्रात चौफेर प्रगती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सलग 3 ऱ्या वेळी सत्तेवर आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्नशील आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यांच्या माध्यमातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजप कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी दिशादर्शक ठरेल, असे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व कार्यकर्ते, बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी केले आहे.
__________________________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here