विजय शिंदे
८० वर्षांच्या वृद्धाने गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात ही घटना घडली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
या घटनेमुळे इंदापूरमध्ये खळबळ उडाली आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील एका गावामध्ये ही घटना घडली. एका २६ वर्षीय गतीमंद मुलीवर ८० वर्षाच्या वृद्धाने बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. या घटनेची माहिती मिळताच काही धार्मिक संघटना ही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. वालचंदनगर पोलिसांनी तातडीने आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. या घटनेचा अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद मिठ्ठापल्ली करत आहेत.