इंदापूर तालुका तळहातातील फोडा सारखा जपला परंतु इंदापूरच्या विद्यमान आमदारांनी तो ठेकेदाराच्या हाती दिला.!!

विजय शिंदे 

पूर्वीच्या सर्वच आमदारांनी इंदापूर तालुका तळहातातील फोडा सारखा जपला परंतु इंदापूरच्या विद्यमान आमदारांनी तो ठेकेदाराच्या हाती दिला त्यामुळे महाराष्ट्रात इंदापूरची वेगळी ओळख निर्माण झाली असे म्हणत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली.

इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाटील बोलत होते. यावेळी विलासराव वाघमोडे, मारुतीराव वनवे, दत्तात्रय शिर्के, बाबा महाराज खारतोडे, हनुमंतराव तोबरे, रघुनाथ राऊत, भास्कर गुरगुडे, शांतीलाल शिंदे, विजय देवकर, अजित खबाले, संदेश शिंदे, अमोल इंगळे, रमेश देवकर, अमरदीप काळकुटे, प्रफुल चव्हाण, महेश शिर्के, विष्णू मोरे, श्रीमंत शिंदे, अमोल चंदनशिवे, बबलू पठाण व इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले इंदापूर तालुक्यातील जनतेचा आग्रह मान्य करून येत्या काही दिवसात इंदापूर विधानसभा लढवण्याबाबत निर्णय घेणार आहे, गेली दहा वर्षात इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अन्याय सहन केला. लोकप्रतिनिधी हे तालुक्याचे कुटुंब प्रमुख असतात परंतु त्यांनी वाद लावण्याचे काम केले त्यामुळे आता परिवर्तन अटळ असून येणाऱ्या काळात इंदापूर तालुक्यातील विकास कामांचे एक व्हिजन तयार केले आहे.

यावेळी कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त करताना हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. यावेळी पाटील यांनी काही दिवसात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल चंदनशिवे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here