विजय शिंदे
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंदापूर मध्ये २३ मार्च च्या दरम्यान एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेला खा शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, खासदार अमोल कोल्हे,आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप यांच्यासह डझनभर नेते या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने इंदापूर तालुक्यात मालकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीचे आयोजन केली होती. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने , राष्ट्रवादीचे(शरद पवार गट) तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील,कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे ,सागर मिसाळ ,आम आदमी पक्षाचे अमोल देवकाते,नितीन कदम ,काँग्रेसचे निवास शेळके,तानाजी भोंग,रमजान बागवान, जाकीर काझी,अक्षय कोकाटे,छाया पडसळकर, रेश्मा शेख, अंकुश दोरकर उपस्थित होते.
खा शरद पवार हे मावळ च्या सभेत आ. सुनील शेळके यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर इंदापूर मध्ये काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.