एकदा आशीर्वाद द्या तुमचा हा भाऊ प्रवीण माने कधीच तुमचे उपकार विसरणार नाही.!!

विजय शिंदे 

एकदा आशीर्वाद द्या तुमचा हा भाऊ प्रवीण माने कधीच तुमचे उपकार विसरणार नाही म्हणत पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तुतारी फुकली आहे.

इंदापूर विधानसभा लढवण्यासाठी सर्वच इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. प्रवीण माने यांच्या वतीने आज इंदापूर येथे आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमा वेळी उपस्थित महिलांना माने यांनी एक वेळेस आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे.

इंदापूर विधानसभेसाठी महायुतीकडून आमदार दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. आमदार भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बंडाच्या तयारीत आहेत. तर महाविकास आघाडीकडे प्रवीण माने व आप्पासाहेब जगदाळे हे दोघे इच्छुक आहेत.

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने माने- जगदाळे की ऐनवेळी पाटील यांना उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे यामध्येच पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी विधानसभा लढवणार असल्याचे जवळपास जाहीर केल्याचे दिसून येते.

माने यांच्या भूमिकेने इंदापूर विधानसभा दुरंगी होणार की तिरंगी शरद पवार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here