पळसदेव येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ.

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या दृष्टी आरोग्याचा विचार करून प्रवीणभैय्या माने मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर पळसदेव गावी संपन्न झाले. पळसदेव आजूबाजूच्या गावातील असंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपली मोफत नेत्र तपासणी करून घेतली.

सकाळी दहा वाजता माजी बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे प्रविण माने यांच्या शुभहस्ते या शिबिराच्या उदघाटन पार पडले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना या प्रदूषित वातावरणात नागरिकांना सध्या दृष्टीदोष संदर्भातील असंख्य आजारांना सामोरे जावे लागत असल्याने आपण हे नेत्रतपासणी शिबीर राबवले असून यातून मोतीबिंदू संदर्भातील समस्या अथवा चष्म्याची गरज असणाऱ्या रुग्णांना प्रामुख्याने सेवा देण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले.

निलेश रंधवे, अमरसिंह मारकड, तुषार चव्हाण, अमोल डोंगरे, छगन बनसुडे, दीपक सातव, देविदास लावंड, अंकुश दोरकर व अक्षय भोसले यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने छायाताई पडसळकर, वामनतात्या वीर, किरण लावंड, राजाराम बनसोडे, प्रसाद जगताप, सतीश मोरे, बबन बनसोडे, अशोक डोंगरे, रोहिदास गेंड, सोमनाथ तनपुरे, संदेश गायकवाड, निसार तांबोळी, रोहन लावंड, सुहास माने, अभय गायकवाड, अंबादास भिसे, प्रविण साळुंखे, गुलाब शिंदे, नामदेव पवार, डॉ. शरद शिर्के, देविदास सूर्यवंशी, बापूराव साळवे, यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here