इंदापूर अर्बन बँकेचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सलग २ वर्षांसाठी गौरव!

विजय शिंदे

राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या इंदापूर येथील इंदापूर अर्बन को-ऑप बँक लि. बँकेचा सन 2022-23 व 2023-24 या दोन्हीं आर्थिक वर्षासाठी शून्य टक्के एनपीएच्या सक्षम अशा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये शनिवारी (दि.28) या दोन्हीं वर्षाकरिता 2 स्मृतीचिन्हे व प्रशस्तीपत्रे देऊन गौरव करण्यात आला.

पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनचा सन 2022/23 व 23-24 या दोन्हीं वर्षांकरिता झालेल्या नागरी सहकारी बँक गुणगौरव समारंभामध्ये हा गौरव करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील युवकांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कर्मयोगी शंकररावजी पाटील, राजेंद्रकुमार घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन पाटील यांनी बँकेची स्थापना केली. बँकेच्या या गौरवाबद्दल इंदापूर अर्बन बँकेचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर अर्बन बँकेचे सभासद, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांचे अभिनंदन केले.
सदर गौरव समारंभ प्रसंगी राज्याचे सहकार आयुक्त दिपक तावरे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र राज्य सह बँक लि. मुंबई चे प्रशासक विद्याधर अनास्कर, पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

सदरचा पुरस्कार बँकेचे चेअरमन देवराज जाधव, व्हा.चेअरमन सत्यशील पाटील, संचालक लालासाहेब सपकाळ, तानाजी निंबाळकर, विजय पांढरे, मच्छिंद्र शेटे पाटील, सुभाष बोंगाणे, स्वप्निल सावंत, संजय जगताप, अविनाश कोतमिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय तावरे, वसुली अधिकारी जोतीराम जामदार यांनी स्वीकारला.

=====
बँक तालुक्यातील जनतेच्या दैनंदिन कामकाजाचा घटक- हर्षवर्धन पाटील

इंदापूर अर्बन बँकेस सन 2023 /24 या आर्थिक वर्षामध्ये ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. या बँकेचे माध्यमातून हजारो कुटुंबांचे संसार उभे राहिले आहेत. इंदापूर अर्बन बँक ही तालुक्यातील जनतेच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य घटक बनली आहे, असे गौरवोद्गार बँकेचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
______________________________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here