विजय शिंदे
काटी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती जिल्हा परिषद पुणे तथा संचालक प्रवीण माने यांच्या माध्यमातून संपूर्ण इंदापूर तालुक्यातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज काटी गावात संपन्न झाले.
प्राथमिक आरोग्य केंद्र काटी येथे आयोजित करण्यात आलेल्या या नेत्र तपासणी शिबिराच्या निमित्ताने तब्बल १०९३ हून अधिक नागरिकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली. यातील ७४० नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले असून आवश्यकता असणाऱ्या २४ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुणे येथील भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे होणार असल्याची माहिती प्रवीण माने यांनी यानिमित्ताने दिली.
संदीप सोलनकर, वसंत सोलनकर, शिवाजी जगताप, गौरव पवार, किरण देवकर, निलेश रंधवे, छगन बनसुडे, अंकुश दोरकर यांनी काटी येथील या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
तर या कार्यक्रमाचे निमित्ताने विलास बापू वाघमोडे, छायाताई पडसळकर, अमोल मुळे, सुनील खाडे, सचिन सोलनकर, सुनीताताई भोसले, आस्माताई मुलाणी, भीमराव यादव, दत्तात्रय माने, गणेश गुरव,भीमराव यादव, पांडुरंग मोहिते, डॉ. शरद शिर्के, रणजीत गोळे, राजाराम गोफणे, आरडे सर, मंगेश माने, विकास भोसले, सतिश भोसले, विशाल भोसले, केदार कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.