पाटलांचं दसऱ्या आधीच राजकीय सीमोल्लंघन…?

विजय शिंदे 

विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच इंदापूर तालुक्यात सर्वच पक्ष व नेते ऍक्टिव्ह झाले आहेत.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत परंतु महायुती मधून आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याचेही चर्चा आहेत.

परंतु मध्यंतरी एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की आपण विधानसभा लढवणार आहे, पुढील राजकीय निर्णय पितृपक्ष संपल्यानंतर घेऊ, यानुसार पाटील हे ऑक्टोंबर च्या पहिल्या आठवड्यात तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्ते व मतदार यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दसऱ्या आधीच भाजप मधून राजकीय सीमोल्लंघन करणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हर्षवर्धन पाटील आपला राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत.

यापूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील  जिल्हा परिषद गटात संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते, या मेळाव्यात बहुतांश  कार्यकर्त्यांनी पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी अशी मागणी केली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here