विजय शिंदे
आमदार दत्तात्रय भरणे यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत मानले शेतकऱ्यांचे आभार…
बैलपोळा सणाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांनी आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या विकास कामांची पोचपावती देत प्रेमाने सर्जा राजाच्या सजावटीतून कृतज्ञता दाखवली. लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही इंदापूर तालुक्याच्या जिव्हाळ्याचा विषय आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याने या योजनेस मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
या कामाच्या प्रति शेतकऱ्यांनी ऋण व्यक्त केले. यावर आमदार दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंदाचा आणि त्यांच्या विकासाचा एक छोटासा भाग होणे हे मोठे भाग्य आहे असे म्हटले आहे.