विजय शिंदे
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र व निरा भिमा सहकारी साखर कारखाने संचालक राजवर्धन पाटील यांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचे स्टेटस ठेवल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे लवकरच राष्ट्रवादी (sp)काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर झाले आहे.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रवेश करणार हे अनेक दिवसापासून चर्चा होती मात्र पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी चर्चेला पूर्णविराम दिला असून त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे आता समोर येत आहे.