इंदापूर शहरातील हर्षवर्धन पाटील संपर्क कार्यालयावरील बॅनर हाटले..!!

विजय शिंदे 

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश निश्चित झाला असून त्यांनी राष्ट्रवादीचे (sp)अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापुर शहरात जनसंपर्क कार्यालय असून त्यावरील भाजप नेत्यांचे फोटो हटवण्यात आले असून भारतीय जनता पक्ष हा मजकूर काढण्यात आला आहे.

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचे स्वीय सहाय्यक देवराज देशमुख हे उपलब्ध असतात आतापर्यंत त्या कार्यालयावर भारतीय जनता पार्टी असा उल्लेख होता परंतु पाटील यांचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश निश्चित झाल्याने तो बॅनर आता हटवण्यात आला असून नेत्यांचे फोटो हे काढण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here