विजय शिंदे
माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून भाटनिमगाव ,अवसरी, बेडसिंगे व बाभूळगाव येथील युवकांना तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी व्यायाम साहित्य देण्यात आले आहे.
यासाठी परिसरातील युवकांनी व्यायाम साहित्य व इमारतीची मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली होती. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे व पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे यांनी पाठपुरावा केला.
यावेळी बोलताना अतुल झगडे म्हणाले इंदापूर तालुक्यातील युवक हे स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरतीची तयारी करत असताना तंदुरुस्त असावेत या उद्देशाने आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी व्यायामाचे साहित्य दिले आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक महिला यांच्यासाठी ओपन जिम इंदापूर तालुक्यात अनेक गावात दिली आहे. भाटनिमगाव ,अवसरी, बेडसिंगे व बाभूळगाव येथील युवकांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे जिम साहित्य व इमारतीची मागणी केली होती त्यानुसार आमदार दत्तात्रय भरणे यांनी साहित्य दिले आहे.
यावेळी इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन व संचालक पंजाबराव गायकवाड यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.