विजय शिंदे
७ ऑक्टोंबर हा इंदापूर तालुक्यासाठी परिवर्तन घडवणारा दिवस आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित रहा असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक युवक व महिला वर्गाला केले आहे. इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते,यावेळी वडापुरी-काटी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे येत्या ७ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत तशी अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले उद्याची विधानसभा निवडणूक ही इंदापूर साठी महत्त्वाची असून परिवर्तन करण्यासाठी व मागील दहा वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या मागे आपण ताकतीने उभे राहण्याची गरज आहे.
गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक यांना प्रवेश सोहळ्यांचे आमंत्रण देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आग्रह करावा, यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करावे असे मार्गदर्शन पाटील यांनी केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले.