विजय शिंदे
सोनाई परिवाराचे संचालक तथा माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे प्रवीण माने यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर इंदापूर तालुक्यातील माळवाडी नं. १ या गावी संपन्न झाले. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादातून संपन्न झालेल्या या शिबिरामध्ये तब्बल ९२८ नागरिकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली.
माळवाडी नं. १ येथील गणेश मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे सकाळी १० वाजता प्रविण माने यांच्या हस्ते उदघाटन होऊन नेत्र तपासणी शिबिरास सुरवात झाली.
दिवसभर पार पडलेल्या या नेत्र चिकित्सा शिबिरात एकूण ९२८ नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली असून यातील ५०९ नागरिकांना चष्मा वाटप करण्यात आले असून यातील १३ जणांची पुणे येथील भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडणार आहे.
साधू नरुटे, प्रविण निगडे, दत्ता रासकर, सुनिल पिंपरे, माधव फलफले, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर निलेश रंधवे, छगन बनसुडे, अंकुश दोरकर, डॉ. शरद शिके, तमन्ना मॅडम, डॉ. संतोष रणवरे यांनी या शिबिराचे नियोजन पाहिले.
तर या शिबिराच्या निमित्ताने राघू मदने, मच्छिंद्र व्यवहारे, अमोल मुळे, प्रकाश गडदे, संजय शिंदे, अनिल ढावरे, तानाजी वलेकर, समद सय्यद, शुभम शिंगाडे, संजय सुळ, शिवाजी जगताप, तुषार चव्हाण, भास्कर मदने, शिवाजी शहाणे, महेश व्यवहारे, दत्ता रासकर, अमोल वलेकर, धनाजी वलेकर, सोमनाथ वलेकर, रामभाऊ क्षीरसागर, सुभाष व्यवहारे, अमोल डोंगरे, नागेश गायकवाड, पिनू रणवरे, निलेश जाधव, संकेत वाघमोडे, संग्राम माने, गौरव रणवरे, अमित माने, शिवराज ढावरे, आदर्श तरंगे, निलेश माने, योगेश वलेकर यावेळी उपस्थित होते.