विजय शिंदे
जंक्शन आनंदनगर येथील ग्रामदैवत श्री.नंदिकेश्वर महादेव यात्रा संदर्भात आज यात्रा कमिटीची बैठक झाली या वेळी यात्रा कमिटी च्या अध्यक्ष पदी अश्विन उत्तम जाधव यांची तर उपाध्यक्ष संतोष वाघमोडे, खजिनदार पदी किरण यादव व अमोल गडचे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी वालचंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री साळुंखे साहेब व आनंदनगरचे सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर ते उपसभापती रोहित मोहोळकर व जंक्शनचे सरपंच राजकुमार भोसले सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष श्री.सागर बाबा मिसाळ सामाजिक कार्यकर्ते श्री.संभा बनसोडे,चंद्रकांत सोळशे सर,संजय आप्पा शिंदे,सुभाष देसाई,श्री.पुंडलिक सोनवणे सर व जंक्शन आनंदनगर चे ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची रूपरेषा// २० एप्रिल साय ६ वाजता छबीना,दिनांक २१रोजी कीर्तन,दिनांक २२ ऑर्केस्ट्रा, २३ रोजी हनुमान जयंती व महाप्रसाद आणि यात्रेची सांगता.