रमेश आप्पा देणार अजित दादांना गोलिगत धोका.? लवकरच तुतारी हाती.!!

विजय शिंदे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी बाजू पलटण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे रमेश आप्पा उपमुख्यमंत्री अजित दादांना गोलिगत धोका देण्याच्या तयारीत आहेत.तालुक्यातील मतदारांना डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पुण्यातील निसर्ग कार्यालयात मुलाखती सुरू आहेत. शनिवारी मराठवाड्यातील अनेकांनी शरद पवार यांना भेटून उमेदवारीसंबंधी चर्चा केली. तर रविवारी रात्री बारामती शेजारील दौंड विधानसभेच्या इच्छुक उमदेवारांची बैठक पवार यांनी मोदीबाग निवासस्थानी घेतली.

मोदीबागेत झालेल्या बैठकीला माजी आमदार रमेश थोरात, शरद पवार गटाचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, डॉ. भरत खळदकर, वंदना मोहिते, दिग्विजय जेधे या पाचही इच्छुक उमेदवारांमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. दौंड विधानसभेच्या जागेसंदर्भात आणि उमेदवारीसंदर्भात पवार यांनी पाचही इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली.

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे अलिखित सूत्र ठरलेले असून ‘जिथे ज्याचा आमदार तिथली जागा त्यांच्याकडे’ यानुसार दौंडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्याकडेच ही जागा जाणार असल्याने त्यांचे परंपरागत विरोधक रमेश थोरात त्यांचा पुढील ‘मार्ग’ शोधत आहेत.

महायुतीत जागा भाजपला जाणार हे मला माहिती आहे. गेली ४० वर्षे राजकारण करतोय. त्यामुळे तालुका-जिल्हा आणि राज्याचे राजकारण बऱ्यापैकी जाणतो. परंतु मी तालुक्यात फिरत असताना, गावागावात जाऊन लोकांशी बोलत असताना मला निवडणूक लढविण्याविषयी लोकांमधून कमालीचा आग्रह आहे, असे रमेश थोरात म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here