विजय शिंदे
आगामी विधानसभा निवडणूकीआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठे धक्के बसत आहे. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहे.आपण अपक्ष निवडणूक लढणार आहे. अशी घोषणा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे.
सोमवारी संजय शिंदे यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्याला आमदार बबनराव शिंदे आणि धनराज शिंदे देखील उपस्थित होते. त्यावेळी संजय शिंदे म्हणाले, शरद पवार माझे श्रद्धास्थान आहेत, तर अजित पवार माझे नेते आहेत.
मी अपक्ष निवडणूक लढवणार, हे माझ्या नेत्यानेच जाहीर केले. मी अपक्ष निवडणूक कोणत्या पद्धतीने लढवणार याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. अजित पवारांनी करमाळ्यात लाडकी बहिणी कार्यक्रमात बोलताना संजयला मत द्या असे म्हटले. पण त्यांनी त्यावेळी कोणत्या चिन्हाचा उल्लेख केला नाही. हे सर्व परवानगी घेऊनच केले आहे. त्यामुळे मी करमाळ्यातून अपक्ष निवडणूक लढणार आहे. अशी घोषणा त्यांनी केली.