निमगाव केतकी येथे रंगला खेळ पैठणीचा.

विजय शिंदे 

सोमवारी निमगाव केतकी येथील महिला वर्गासाठी प्रविणभैय्या माने मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम पार पडला. निमगाव केतकी येथील केतकेश्वर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात निमगाव व आजूबाजूच्या गावातील महिला वर्गाने आवर्जून उपस्थिती लावली होती.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेस मानाची पैठणी साडी भेट देण्यात आली होती, तर प्रमुख बक्षिसांमध्ये प्रथम क्रमांकाच्या पारितोषिक साठी एल इ डी टीव्ही, द्वितीय पारितोषिक फ्रीज, तिसऱ्या क्रमांकासाठी कुलर, तर चौथ्या क्रमांकाला पिठाची चक्की आणि पाचवे पारितोषिक मिक्सर देण्यात आला.

निमगाव केतकीच्या अंजूश्री शितलकुमार डोंगरे यांना प्रथम क्रमांक, गोतोंडीच्या आरती पंकज माने यांना द्वितीय क्रमांक, नलवडे वस्तीच्या संचिता धीरज नलवडे यांना तिसरा क्रमांक, नलवडे वस्तीच्या प्रिया संदीप नलवडे यांना चौथा क्रमांक तर खोरोची गावाच्या सुरेखा रमेश नगरे यांना पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, ब्रह्मदेव शेंडे, दशरथ बनकर, अनिकेत निंबाळकर, बबन लावंड सर, किरण लावंड, अमोल मुळे, कांतीलाल झगडे, आप्पा वाघमोडे, बाळासाहेब कोकाटे, मोहन काटे, नवनाथ कोकाटे, शुभम शिंगाडे, प्रतीक काळे, बबन खराडे, अशोक मिसाळ, बाबाजी भोंग, बबन भोंग, अजित बनसुडे, सतीश कोकरे, किरण बोरा, विजयाताई कोकाटे, रूपालीताई रणदिवे, मंजिरीताई लावंड, बनकर आप्पा, भारत माने, संदीप माने, धनराज नलवडे, सुनिल खाडे, हनुमंत सानप, संदीप सोलनकर, विकास खिलारे, सर्व माने कुटुंबीय व पत्रकार बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here