विजय शिंदे
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पुणे जिल्ह्यातील मतदारसंघासाठी पक्षनिरिक्षक व समन्वयकांची नियुक्ती केली आहे.जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या बाबत संबंधितांना तातडीने त्या त्या मतदारसंघात जाऊन प्रमुखांशी भेटून आढावा घेण्यास सुरवात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विधानसभा मतदारसंघात इतर मतदारसंघातील निरिक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून त्या त्या मतदारसंघातील परिस्थिती पक्षश्रेष्ठींपर्यंत जाण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदारसंघ निहाय पक्षनिरिक्षक पुढील प्रमाणे..
इंदापूर- योगेश जगताप (बारामती)
बारामती-बाळासाहेब पाटील ( बोरी इंदापूर)
दौंड- भरत खैरे (बारामती)
पुरंदर- नंदू काळभोर (फुरसंगी)
भोर-वेल्हा-मुळशी- प्रवीण शिंदे
मावळ- सुनिल चांदेरे (मुळशी)
जुन्नर- दिगंबर दुर्गाडे (पुरंदर)
आंबेगाव- संजय काळे (जुन्नर)
शिरूर -हवेली- सचिन घोटकुले व पूजा बुटटे पाटील.
खेड- सुभाष जाधव (वडगाव मावळ)
खडकवासला- भगवान पासलकर (राजगड वेल्हे)