विजय शिंदे
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच प्रवक्तेपदी पदी नामांकित विधीज्ञ राहुल रत्नाकर मखरे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मखरे यांना दिले आहे.
राहुल मखरे हे नामांकित वकील असून दलित चळवळीतील नेते म्हणून त्यांच्याकडे राज्यभर पाहिले जाते, त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला राज्यभर फायदा होणार असल्याचे बोलले जाते.
सामाजिक शैक्षणिक व इतर लोकोपयोगी क्षेत्रामध्ये आजवर दिलेले योगदान लक्षात घेऊन आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सरचिटणीस व प्रवक्ता या पदावर नियुक्ती केली असून आपण दिलेली जबाबदारी संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व शक्तीनिशी योगदान द्याल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना राहुल मखरे म्हणाले पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचा विचार राज्यभर पोहोचवण्यासाठी तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी राज्यभर काम करणार आहे.