विजय शिंदे
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी व निरीक्षक नंदूकाका जगताप यांनी केले, ते इंदापूर येथे विश्रामगृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले इंदापूर तालुक्यात काँग्रेस कमिटीची आगामी लोकसभा निवडणूक तसेच पक्ष संघटनेच्या बूथ कमिटी, बी एल ओ कार्यकर्त्यांच्या नोंदणी करण्यात याव्यात,तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय होण्याच्या आदेश यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिले यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे समन्वयक लहूअण्णा निवगुणे उपस्थित होते.
यावेळी तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,सरचिटणीस तसेच विविध सेलचे पदाधिकारी, इंदापूर शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी इंदापूर तालुका भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष युवराज मामा पोळ व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीस संदर्भात बोलताना निवास शेळके म्हणाले पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. इंदापूर तालुक्यातील काँग्रेस पक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रियपणे काम करेल.