विजय शिंदे
राज्यपाल नियुक्ती विधानपरिषद आमदारकीसाठी ज्या १२ लोकांची नियुक्ती गेल्या ५ वर्षापासून रखडली आहे. त्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यपाल नियुक्त १२ पैकी ७ नावांवर सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं असून आमदारांच्या नावांची यादी राज्यपालाकंडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहित लागू होण्याआधी महायुतीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. १२ रिक्त जागांपैकी ७ जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्याचबरोबर या नवनियुक्त आमदारांचा शपथविधी उद्या (१५ ऑक्टोबर) होण्याची शक्यता आहे.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्ती विरोधात ठाकरे गटाचे सुनील मोदी यांनी कोर्टात याचिका दाखल केली असून याची सुनावणी पूर्ण झालीआहे. उच्च न्यायालय २३ ऑक्टोबरपर्यंत निकाल देणार आहे.
राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या नावावर महायुतीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले असून भाजप ३तरशिवसेना वराष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी २-२ जागा असा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे.
भाजपकडून महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह विक्रांत पाटील आणि बाबू सिंग महाराज राठोड यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं माजी खासदार हेमंत पाटील आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदारांची नियुक्त ५ वर्षापासून रखडलेली –
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी नावांची यादी पाठवली होती. या यादीत राष्ट्रवादीतर्फे एकनाथ खडसे, राजूशेट्टी, यशपाल भिंगे, आनंदशिंदे, काँग्रेसतर्फे रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुध्द वनकर आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर, नितीन बानगुडे पाटील यांच्या नावांची शिफारस केली होती.
मात्र, भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत कोणताही निर्णयन घेता यादीला केराची टोपली दाखवली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडी सरकार कोसळले व आमदारांची नियुक्ती प्रलंबित राहिली.