इंदापूरच्या प्रदीप दादांच्या पदरी निराशा; पंकज भुजबळ, इंद्रनील नायकवडी यांना संधी.!!

विजय शिंदे 

कुशल संघटक अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असलेले पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच आली आहे.प्रदीप गारटकर हे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक होते, यासाठी आमदार दत्तात्रय भरणे व तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती.आज विधान परिषदेच्या सात जागांचा शपथविधी झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंद्रनील नायकवडी व पंकज भुजबळ यांना संधी मिळाली आहे, प्रदीप गारटकर यांना संधी मिळेल या आशेवर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या पदरी निराशाच आली असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू आहे.

प्रदीप गारटकर हे इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष असून १९९५.९९.२००४ साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आहे, पतीत पावन संघटना,भाजप, शिवसेना राष्ट्रवादी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

अनेक वर्ष राष्ट्रवादीत काम करूनही प्रदीप गारटकर व समर्थकांची निराशा झाली असून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विजयात गारटकरांचा मोठा वाटा आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना राष्ट्रवादीला सर्वाधिक आमदार व खासदार जिल्ह्यातून देण्याचे काम प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे.

एक अभ्यास व कुशल संघटक असी ओळख असलेले गारटकर यांना विधान परिषद मिळेल अशी अपेक्षा इंदापूर शहर व ग्रामीण भागातील तसेच त्यांच्या पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना होती. गारटकर यांची संधी हुकल्याने पुन्हा त्यांचे विधिमंडळात जाण्याचे स्वप्न लांबणीवर पडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here