तालुक्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठवा.

विजय शिंदे 

इंदापूर तालुक्यात मलिदा गँग उंदीर व घुशी सारखी तालुका भुसभुशीत करत असून तालुक्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सागर मिसाळ यांनी केले.

अंकिता पाटील- ठाकरे यांनी सुरू केलेल्या जनसंवाद यात्रे निमित्ताने ते भाटनिमगाव येथे बोलत होते. यावेळी अंकिता पाटील ठाकरे, महिला अध्यक्ष छाया पडसळकर, प्रफुल चव्हाण, दत्तात्रय पांढरे, सरपंच अजित खबाले, भागवत शिंदे, श्रीमंत खबाले, मोहन खबाले, नागनाथ खबाले, लतीफ पठाण, छगन गवळी, सुभाष मोरे, समाधान भोसले, बालाजी गवळी, अनिल पवार,अमोल देवकर, चंद्रकांत चव्हाण, अमीर सय्यद, रोहन मगर, गणेश गवळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सागर मिसाळ म्हणाले या देशात कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला, शरद पवार यांच्या हात बळकट करण्यासाठी व तालुक्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे.

यावेळी अंकिता पाटील- ठाकरे यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची पोलखोल करत आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली, तालुक्यात सुरू असलेली कामे निकृष्ट असून फार मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सुरू असलेल्या साडी वाटपा वरही त्यांनी भाष्य केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमंत खबाले यांनी केले,अजित खबाले, भागवत शिंदे, छगन गवळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here