विजय शिंदे
धानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षाकडून बैठकांवर बैठका सुरू आहे. लवकरच जागावाटपाचा निर्णय हे पक्ष जाहीर करण्याची शक्यता आहे. काही पक्षांची पहिली यादी तयार असून ते लवकरच जाहीर करतील.
पहिल्या यादीत सुमारे २५ उमेदवारांना तिकीट मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेली अनेक वर्षे रासपचे काम करीत असलेल्या पदाधिकाऱ्यांना यादीत संधी मिळणार आहे. बारामतीमध्ये रासपचे जिल्हाध्यक्ष राहीलेल्या संदीप चोपडे यांना रासपचे तिकीट मिळणार आहे. ते पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आहेत.
इंदापूरमध्ये तानाजी शिंगाडे हे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. जतमध्ये रासपचे युवा नेते अजितकुमार पाटील यांना सांगली जिल्ह्यातील जतमध्ये संधी मिळणार आहे. सांगोलामध्ये आबा मोटे हे रासपचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते सध्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. अक्कलकोटमध्ये सुनील बंडगर हे रासपचे विभागीय उपाध्यक्ष आहेत. तर पनवेलमध्ये सुदाम जरग हे रासपचे कोषाध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महादेव जानकर यांना राज्यपाल नियुक्त यादीत नाव असेल असं आश्वासन महायुतीने दिलं होतं. मात्र नाव नसल्याने जानकर नाराज झाले आणि त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परभणी लोकसभेला पराभूत झाल्यानंतर महादेव जानकर राज्यपाल नियुक्त कोट्यातून इच्छुक होते. महायुतीने विचारात न घेतल्याने महादेव जानकर नाराज होते. अखेर त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
रासपच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं –
बारामती (जि. पुणे) – संदीप चोपडे
इंदापूर (जि. पुणे) – तानाजी शिंगाडे
पाटण (जि. सातारा) – विठ्ठल यमकर
जत (जि. सांगली)- अजितकुमार पाटील
सांगोला (जि. सोलापूर)- आबा मोटे
अक्कलकोट (जि. सोलापूर)- सुनील बंडगर
पनवेल (जि. रायगड) – सुदाम जरग
परंडा (जि. धाराशिव) – नाना मदने
तुळजापूर (धाराशिव)- आश्रुबा कोळेकर
आष्टी पाटोदा (जि. बीड)- शिवाजी शेंडगे
राहुरी (जि. अहिल्यानगर) – नाना जुनधारे
अंबरनाथ (जि. ठाणे) – रूपेश थोरात
जिंतूर (जि. परभणी) – अशोक हाके