विजय शिंदे
नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने हर्षवर्धन पाटील यांची पार्लमेंटरी बोर्ड संसदीय मंडळा मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिले आहे.
त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली असल्याची चर्चा आहे. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमध्ये ही त्यांचा समावेश असेल.