मोहिते पाटलांचा आमदारकीचा राजीनामा! आज रात्री राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.?

विजय शिंदे 

महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभेच्या तोंडावर शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. आज रात्री ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

 

शरद पवारांचा भाजपला हादरा

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने कंबर कसली असून महायुतीमधील अनेक दिग्गज नेते तुतारी हाती घेण्यास इच्छुक आहेत. गेल्या महिनाभरापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे. अशातच आता शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का दिला आहे.

मोहिते पाटलांचा राजीनामा!

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार, विजयसिंह मोहिते पाटील यांची सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा पाठवल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. आज रात्रीच रणजितसिंह मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. विजयसिंह मोहिते पाटीलही आज सांसदीय बैठकीला हजेरी लावणार असून या बैठकीनंतर हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here