विजय शिंदे
भाटनिमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन केले होते.यावेळी नवीन मतदार महिला व ग्रामस्थांना विद्यार्थ्यांनी फलकाच्या आधारे व घोषवाक्य यांच्या घोषणा देत मतदान करण्याविषयी जागृती निर्माण केली.
मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ११४ विद्यार्थी सह मुख्याध्यापक सचिन देवडे,योगराज गाडेकर, गजानन जाधव, नागनाथ वाजरवाडे, जगन्नाथ थोरात आदी शिक्षक सहभागी झाले.