अंकिता पाटील-ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद.!!

विजय शिंदे 

इंदापुरात विधानसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी रंगत अधिक वाढली आहे, विधानसभेसाठी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये तुल्यबळ अशी लढत होणार आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून तर माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून तिसऱ्यांदा मैदानात उतरणार आहेत.

इंदापूर तालुक्यात जनसंवाद यात्रेचे आयोजन करत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील- ठाकरे या मैदानात उतरल्या आहेत, त्यांनी गावोगावी ठिकठिकाणी सभा घेत विरोधकांवर टीका केली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष छाया पडसळकर यांनी खिंड लढवून ठेवली आहे.

गेल्या दहा वर्षांमध्ये इंदापूर तालुक्यात युवक आणि महिलांना रोजगार देण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न झाले नाहीत असा आरोप अंकिता पाटील- ठाकरे करत आहेत. तालुक्यात नेतृत्वाचा आणि दूरदृष्टीचा अभाव होता. त्यामुळे सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने तालुका कायमच पिछाडीवर गेला. सध्या तालुक्यात फक्त मलिदा गँगच्या ठराविक लोकांचा विकास झाला आहे.

जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे अधिकच आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळणार आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, निरा- भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील तसेच पाटील कुटुंबातील इतरही सदस्य मैदानात उतरले असून गावोगावी वाडी वस्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून रणनीती आखली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here