विजय शिंदे
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे उद्या २४ ऑक्टोंबर रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणार असून पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे.
आता गुरुवारी २४ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी खा सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे,तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
माने -जगदाळे सोबत राहतील..
यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की इंदापूर तालुका हा शरद पवार यांना मानणारा आहे,इंदापूर विधानसभेसाठी शरद पवारांनी जो निर्णय घेतला आहे त्याला पक्षातील सर्व पदाधिकारी पाठिंबा देतील.
आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने तसेच त्यांच्याबरोबरचे इतरही सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस(Sp) सोबत असून शरद पवार यांचा निर्णय ते मान्य करतील,विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना राज्यात परिवर्तन करायचे असून आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने यांनी पवार साहेबांन सोबत राहावे असे आवाहन पाटील यांनी केले.