विजय शिंदे
तालुका कार्यक्षेत्रात असलेल्या कर्मयोगी व निरा -भिमा साखर कारखान्यावर विरोधक टीका करतात मात्र तालुक्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्या संदर्भात बोलत नाहीत,गेले दहा वर्ष छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली नसून दोन वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा ही होत नाही, कर्मयोगी व निरा-भिमा कारखान्याची तुलना माळेगाव सोबत करता परंतु छत्रपती संदर्भात एक वाक्य ही बोलत नाही त्यामुळे आपले ठेवायचे झाकून ही पद्धत विरोधकांनी बंद करावी अशी टीका राजवर्धन पाटील यांनी केली.
महायुतीचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांचा आज (२५) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी झालेल्या सभेतील टीकेला राजवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
यावेळी बोलताना राजवर्धन पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार हे आम्हाला वडिलांन समान असून त्यांच्या बाबतीत मी एक वाक्यही बोलणार नाही. परंतु तालुक्यातील विरोधक आमच्यावर खालच्या पातळीवर टीका करतात, हे तालुक्यातील जनतेला पटणार नाही.
यावेळी बोलताना त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या टीकेला उत्तर दिले यापूर्वी इंदापूर तालुक्यात रस्त्याची कामे होत नसल्याचा आरोप आमदार साहेब करतात मग गेली वीस वर्षे कोणत्या रस्त्याने घरी जात होते.? त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता वीस वर्षांपूर्वी नव्हता का .? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले इंदापूर तालुक्यातील जनता गेली दहा वर्षांपूर्वी केलेली चूक सुधारणार असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली इंदापुरातील आमदार विधानसभेत पाठवेल.