“होय” दल बदलले पण तालुक्यातील जनतेला विश्वासात घेऊन जाहीरपणे… पदासाठी जनतेशी गद्दारी नाही केली कधी रात्री तर कधी पहाटे..

विजय शिंदे 

होय आमच्या नेत्याने दल बदलले पण आम्हा तालुक्यातील जनतेला विश्वासात घेऊन जाहीरपणे… पदासाठी जनतेशी गद्दारी नाही केली कधी रात्री तर कधी पहाटे. अशा कडक् शब्दात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे इंदापुरात आले होते त्यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर दलबदलू अशी टीका केली होती, त्या टीकेला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिउत्तर दिले नसले तरी कार्यकर्ते मात्र सोशल मीडियावर चांगलेच आक्रमक झाले आहेत.

इंदापूर तालुक्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुल्यबळ अशी लढत होणार आहे, एकीकडे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे हे मैदानात उतरले आहेत तर दुसरीकडे पराभवाचा वाचपा काढण्यासाठी हर्षवर्धन पाटील सज्ज झाले आहेत, अपक्ष प्रवीण माने ही रिंगणात असल्याने इंदापुरात उत्कंठावर्धक निवडणूक होणार असल्याचे दिसून येत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत (२४) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत (२५ रोजी) मोठे शक्ती प्रदर्शन करत आमदार दत्तात्रय भरणे यांनीही अर्ज दाखल केला.

यावेळी झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली होती त्या टीकेला उत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर अजित पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीची आठवण करून दिली आहे. जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल तस तशे इंदापुरात आरोप प्रत्यारोप होणार असून राजकीय वातावरण अधिक रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here