विजय शिंदे
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक घडामोडींना वेग आलं आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात आज महायुतीकडून अजित पवार यांनी तर महाविकास आघाडीकडून त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यामुळे बारामतीत. पवार विरुद्ध पवार ही चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. यासंदर्भातच बोलताना आज अजित पवारांनी बारामतीत मोठं विधान केलं. ‘लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करून मी चूक केली. पण आता युगेंद्र पवार यांना माझ्या विरोधात उभं करून तीच चूक त्यांनी (शरद पवार यांनी) करायला नको होती’, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच भावूकही झाले.
अजित पवार भावुक होत म्हणाले की, माझ्या विरोधात उमेदवार देऊ नका अस माझ्या आईने सांगितलं होतं, मात्र वरिष्ठांनी देखील याचा विचार करायला पाहिजे. आपल्या घरातील भांडण चव्हाट्यावर आणायला नको होतं. मात्र आपलं घर साधांयला दुसरं कोणी येणार नाही. कुणावर टिका टिपणी करायची नाही, काम करायची आहेत.
सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभा नव्हत करायला पाहिजे. ती माझी चूक होती, ती मी मान्य देखील केली. लोकसभेला ताई आणि विधासभेला दादा अशी भूमिका लोकांची होती, मात्र दादा तो नव्हे. मला राज्याची जबाबदारी असल्याने मला जास्त जबाबदारी घेता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी स्वतः उमेदवार म्हणून प्रचार करावा. प्रत्येकाने स्वतः घर सांभाळले पाहिजे, मात्र माझंच घर आता व्यवस्थित नाही, म्हणून तुम्हाला सांगतोय.
पढे ते म्हणाले की, आज वसु बारस आहे, माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे. मला आज खूप आनंद वाटला. एवढे सगळे बारामतीकर माझ्या रॅलीत सहभागी झाले, याचा मनापासून आनंद वाटला. मी माझी शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही. बारामतीकर मोठं मताधिक्य माझ्या पदरात टाकतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात सगळ्या जाती धर्मातील लोकांनी एकत्रित गुण्या गोविंदाने राहील पाहिजे.
लाडक्या बहीण योजनेवरून आमच्यावर टीका केली जातेय, मात्र या योजनेवर कोणताही स्टे आलेला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. सुनील केदार माजी मंत्री लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात जाऊन ती बंद पाडणार आहेत. हे योग्य नाही. सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला आनंद आणि सुख असावे यासाठी महायुती प्रयत्न करीत राहील. आम्ही सुरू केलेल्या ह्या योजना कायम कशाच सुरू राहतील, यासाठी विचार करून या योजना सुरू केलेल्या आहेत अस ते म्हणाले.