विजय शिंदे
निवडणुकीच्या निकालांची सर्वांचा प्रचंड उत्सुकता असते. एवढी, की काहीजण चक्क पैज लावतात. आता इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव या गावचे घ्या. आज इंदापूर विधानसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस मतदान होणे अजून बाकी आहे,असे असताना आपल्याच उमेदवाराला गावातून अधिक मतदान होईल यावर बाभूळगाव (ता इंदापूर )येथे विलास मच्छिंद्र चव्हाण व सोमनाथ शिवाजी जावळे यांनी होंडा कंपनीचे नवीन युनिकॉर्न गाडी घेऊन देण्याची पैज लावली आहे. तसे शपथपत्रही करून घेतले आहे. त्यावर चार साक्षीदारांनीही स्वाक्षऱ्या केल्या आहेत, हे विशेष.
या शपथपत्रात म्हटले आहे की इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने हे उमेदवार आमदारकीच्या निवडणुकीसाठी उभे आहेत यामध्ये हर्षवर्धन पाटील यांना बाभुळगाव मधील सर्व बूथ वरील एकूण मतदानापैकी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यापेक्षा एक जरी मतदान जास्तीचे मिळाले तर सोमनाथ जावळे यांनी विलास चव्हाण यांना होंडा कंपनीची नवीन युनिकॉर्न गाडी घेऊन देण्याचे ठरले आहे.
याउलट जर हर्षवर्धन पाटील यांच्यापेक्षा भरणे मामा यांना बाभूळगाव मधील सर्व बूथ वरील एकूण मतदानापैकी एक जरी मतदान जास्त मिळाले तर विलास चव्हाण यांनी सोमनाथ जावळे यांना होंडा कंपनीची नवीन युनिकॉर्न गाडी देऊन घेऊन देण्याचे ठरले आहे.त्यामुळे युनिकॉर्न जावळे जिंकणार की चव्हाण हे येणाऱ्या २३ नोव्हेंबरला स्पष्ट होईल.
यापूर्वीचा इतिहास…
यापूर्वी बाभूळगाव गावांमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना अधिकचे मताधिक्य मिळाले आहे, यंदा निवडणूक तिरंगी होणार असल्याने कार्यकर्ते मात्र आपल्याच नेत्याला मताधिक्य मिळेल यावर ठाम आहेत.