इंदापूर विधानसभेसाठी ३८ उमेदवारांचे ५२ उमेदवारी अर्ज दाखल. हर्षवर्धन पाटील नावाचे तीन तर दत्तात्रय भरणे नावाचे दोन उमेदवार रिंगणात.

विजय शिंदे 

इंदापूर विधानसभा निवडणूक 2024 साठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीअंती 38 उमेदवारांनी 52 उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली.अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवार (ता.29) रोजी 18 उमेदवारांनी 22 अर्ज दाखल केले. यामुळे इंदापूर विधानसभेसाठी एकूण 38 उमेदवारांनी 52 अर्ज दाखल केले.

यात प्रवीण दशरथ माने यांनी चार अर्ज (अपक्ष), हर्षवर्धन शहाजीराव पाटील चार अर्ज (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), दत्तात्रय विठोबा भरणे चार अर्ज (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचेसह अमोल अण्णा आटोळे (अपक्ष), हर्षवर्धन गोपाळराव पाटील (अपक्ष), भाऊराव राजाराम झेंडे (अपक्ष), अमोल अनिल रांधवन (अपक्ष), ॲड.गिरीश मदन पाटील यांचे दोन अर्ज (महाराष्ट्र विकास आघाडी), ॲड.राहुल पोपट बंडगर (अपक्ष), अनुप अशोक आटोळे (अपक्ष), सगाजी मोहन कांबळे (अपक्ष), अनिरुद्ध राजेंद्र मदने (अपक्ष), निशिकांत रजनीकांत तोरणे (अपक्ष), अँड पांडुरंग संभाजी रायते (अपक्ष), श्रीपती महादेव चव्हाण (बहुजन समाज पार्टी), हनुमंत कोंडीबा मल्लाव (भारतीय जनसम्राट पार्टी), सविता भीमराव कडाळे (हिंदुस्तान जनता पार्टी), आकाश भाऊ पवार (स्वराज्य निर्माण सेना), सुधीर अर्जुन पोळ (अपक्ष), बाळासो मारुती धापटे (भारतीय नवजवान सेना पक्ष),१) विकास भीमराव गायकवाड (अपक्ष), जावेद बशीर शेख (अपक्ष), तानाजी उत्तम शिंगाडे (राष्ट्रीय समाज पक्ष), अंकिता हर्षवर्धन पाटील दोन अर्ज (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), अंकिता हर्षवर्धन पाटील दोन उमेदवारी अर्ज (अपक्ष), भगवान बापू खारतोडे (अपक्ष), संजय बापू चंदनशिवे (अपक्, किसन नारायण सांगवे (अपक्, पिनेल बाळू चव्हाण (अपक्ष), अमोल शिवाजी देवकाते (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), कल्याणी सुजितकुमार वाघमोडे (अपक्ष), हर्षवर्धन श्रीपती पाटील (अपक्ष), दत्तात्रय सोनबा भरणे दोन अर्ज (अपक्ष), संभाजी मधुकर चव्हाण (अपक्ष), सतीश कौशल्या विठ्ठल जगताप (अपक्ष), सोमनाथ रामहरी खानेवाले (अपक्ष), भीमराव जगन्नाथ शिंदे (अपक्ष)शिवाजी दत्तू आरडे (अपक्ष), हनुमंत सुखदेव बनसोडे (स्वराज्य शक्ती सेना पार्टी)

या प्रमाणे इंदापूर विधानसभेसाठी 38 उमेदवारांनी 52 अर्ज दाखल केले असले तरी अर्जाची छाननी व अर्जाची माघार या मुदतीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here